आठवून आठवून किती आठवू "ती"ला?

सिद्धांत जाधव
Wednesday, 7 August 2019

करून करून किती प्रेम करू तिच्यावर ?
जेव्हापासून तिच्यावर प्रेम करायला लागलो 
तेव्हापासून एवढं नाही केलं प्रेम कोणावर... 

आठवून आठवून किती आठवू "ती"ला?
कधी विसरूच शकत नाही एवढी आठवते ती मला... 
करून करून किती करू कविता? 
खूप झाल्या तिच्यावरच्या कविता,बस पुरे झाले आता... 

करून करून किती प्रेम करू तिच्यावर ?
जेव्हापासून तिच्यावर प्रेम करायला लागलो 
तेव्हापासून एवढं नाही केलं प्रेम कोणावर... 

समजावून समजावून किती समजावू मनाला? 
एकतर्फी आहे हे प्रेम हे काळतच नाही तिला... 

बघून बघून किती वाट बघू तिची 
पाऊलवाट तिची वेगळी असेल तर?
या विचाराचीच सारखी वाटते भीती.... 

सांगून सांगून किती सांगू तिला ?
माझं असलेलं तिच्यावरच प्रेम हे 
कधी कळणारच नाही का तिला...? 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News