हृतिकचं ‘सुपर ३०’मधील पैसा पैसा गाण रिलीज

सकाळ (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • हृतिकचं ‘सुपर ३०’मधील पैसा पैसा गाण रिलीज 
  • ‘पैसा पैसा’ सोशल मीडियावर व्हायरल

  • गाण्यात दारूचा ग्लास घेऊन हृतिक नाचतोय

मुंबई : बॉलिवुड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपटातुन बॉलिवुडमध्ये पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्यासाठी तयार आहे. हृतिक रोशनचा सिनेमा येणार आणि चर्चा होणार नाही असं कधी झालंय का? बॉलिवुड चित्रपटांध्ये वेगवेगळी भुमिका साकारणारा  अभिनेता हृतिक पुन्हा एकदा त्याच्या फॅन्सला खुश करण्यासाठी सज्ज झाला आहे. हृतिकचा‘सुपर ३०’चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. या चित्रपटात हृतिक सुपर ३० चे संस्थापक आनंद कुमार यांच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याच्या व्हिडिओपूर्वी चित्रपटाचं पोस्टर आणि टिझर रिलीज केलं गेलं होतं. ‘सुपर ३०’मधील पैसा पैसा असं या गाण्याचे बोल आहेत. या हृतिकच्या पैसा पैसा सोशल मिडीयावर चांगलीच धूम चालु आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही कालावधीतच सोशल मिडीयावर व्हायरल झालं. 
 
हृतिक रोशनच्या आगामी चित्रपट ‘सुपर ३०’चं गाणं रिलीज झाल्यानंतर फॅन्समधील उत्सुकता वाढली आहे. या गाण्यामध्ये पैशाच्या जोरावर सामान्य माणसाला कशाप्रकारे फसवलं जावू शकतं, हे दाखवलं गेलंय. तसेच हातात दारूचा ग्लास घेऊन हृतिक नाचतोय. हे गाणं गायक-संगीतकार विशाल ददलानीनं गायलंय. तर संगीत मराठमोळ्या अजय-अतुल यांचं आहे. आपल्या भूमिकेशी समरस झालेला हृतिक या गाण्यात वेगवेगळ्या अंदाजामध्ये दिसून येतोय. चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलंय. तर चित्रपट ‘सुपर ३०’येत्या १२ जुलैला रिलीज होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News