'शहेनशाह' बिग बींच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड

काजल डांगे
Saturday, 29 June 2019

अमिताभ यांच्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी त्यांच्या एका चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं आणि तो चित्रपट म्हणजे ‘शहेनशाह’.

बिग बी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी. हिंदी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व, संवाद बोलण्याची शैली तर कमालीचीच. शिवाय बॉलिवूडचे महानायक, बिग बी, शहेनशहा अशी बरीच विशेषणं त्यांना आहेत. अमिताभ यांच्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी त्यांच्या एका चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं आणि तो चित्रपट म्हणजे ‘शहेनशाह’.

या चित्रपटात अमिताभ यांनी साकारलेला ‘पोलिसमॅन’ सुपरहिटच ठरला. फेब्रुवारी १९८८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने तिकिटबारीवर गर्दी केली. खरंतर अमिताभ यांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांची पत्नी जया बच्चन यांचा मोलाचा वाटा आहे. याचच जिवंत उदाहरण म्हणजे ‘शहेनशाह’ चित्रपट. कारण या चित्रपटाची कथा खुद्द जया बच्चन यांचीच होती. या चित्रपटामधील अमिताभ यांचा संवाद चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरला आणि तो संवाद म्हणजे ‘रिश्‍ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं और नाम है शहेंशाह.’

अमिताभ यांनी अगदी रुबाबदारपणे म्हटलेला हा संवाद आजही प्रत्येकाच्या तोंडी आहे. आजही एखादा कलाकार अमिताभ यांची नक्कल करत असेल तर ‘शहेनशाह’मधील हा संवाद तो आवर्जून म्हणतो. टिनू आनंद दिग्दर्शित हा चित्रपट तर बिग बींच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News