‘सकाळ-एनआयई’अंतर्गत सभासद नोंदणी सुरू, एकदा तुम्हीही भेट द्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील उपक्रममराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक आहे. जळगावसह पुणे, पिंपरी- चिंचवड, बारामती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, नवी मुंबई या ठिकाणी हा उपक्रम राबविला जात आहे.

जळगाव - सकाळ माध्यम समूहाच्या ‘न्यूज पेपर इन एज्युकेशन’ अर्थात  ‘एनआयई’ या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची शाळानिहाय सभासद नोंदणी सुरू झाली आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेसह त्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रकल्प उपक्रम राबविले जातात. 

मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक आहे. जळगावसह पुणे, पिंपरी- चिंचवड, बारामती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, नवी मुंबई या ठिकाणी हा उपक्रम राबविला जात आहे. यात सुमारे पाचशेहून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

याचबरोबर शैक्षणिक वर्षात ‘सकाळ एनआयई’ चे १८ अंक सभासदांना मिळतील. यात अनेकविध लेख, गंमतकोडी याचा समावेश असेल, तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी भेटवस्तू देण्यात येईल. लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रायोजक आहेत. आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात व्हावा, यासाठी मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘सकाळ एनआयई’च्या वतीने केले आहे. अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते ५ या कालावधीत ९५७९४८५०१३ या क्रमांकावर संपर्क करावा.

भेटवस्तू, कार्यशाळांसह विविध उपक्रम
‘एनआयई’चे सभासद नोंदणी शुल्क रुपये १५० असून, या शैक्षणिक वर्षात ‘सकाळ-एनआयई’चे १८ पाक्षिक अंक, सोबतच शैक्षणिक भेटवस्तू शाळानिहाय कार्यशाळा, तसेच इतर स्वरूपातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात कलाकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, वाचन व लेखन कौशल्य, प्राणिमित्रांशी संवाद यासह ग्रेड परीक्षा मार्गदर्शन, इकोगणेशा, आंतरशालेय नाट्यस्पर्धा, शालेय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, शिक्षक प्रशिक्षण यासारख्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News