रिगलचे विद्यार्थी धरणग्रस्तांसाठी धावले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

रिगलचे विद्यार्थी धरणग्रस्तांसाठी धावले
जेवण, नवीन कपडे दिले; घरातील चिखल काढण्यास मदत

चिपळूण - येथील धरणफुटी दुर्घटनेनंतर कोंढे येथील रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही माणुसकी दाखवली आहे. स्वखर्चाने दीडशे ग्रामस्थांना जेवण, नवीन कपडे देत मायेचा आधार दिला. धरणग्रस्तांच्या घरातील चिखल काढण्याबरोबरच गुरे पुरण्यासाठी खड्डे मारण्याचे काम केले. कॉलेज व्यवस्थापनाकडून कसलीही सूचना नसताना विद्यार्थ्यांनी मनाने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे तहसीलदार जीवन देसाई यांनी सांगितले. 

तिवरे धरणफुटी दुर्घटनेत २३ जण वाहून गेले. भेंदवाडी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली. वाचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी शेकडो हात येत आहेत. रिगल कॉलेजनेही यात सहभाग नोंदवला. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रिगलचे शेकडो विद्यार्थी एकत्र आले. स्वखर्चाने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे ठरले. प्रत्येकाने आपल्याकडे असलेले पैसे मदतीसाठी जमा केले. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दीडशे जणांचे जेवण बनवले. काहींनी नवे कपडे खरेदी केले. फावडे, झाडू आदी साहित्य घेऊन विद्यार्थ्यांचा चमू तिवरेत गेला. गावात पोहचताच अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेवण दिले. त्यानंतर घरांमध्ये साठलेला चिखल काढला. गुरे पुरण्यासाठी खड्डेही मारण्यास मदत केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News