हिंदू नसल्याने जेवण घेण्यास नकार; झोमॅटोचे ग्राहकाला खणखणीत उत्तर!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

ऑर्डर घेऊन येणारी व्यक्ती बदला अशी मागणी त्यांनी झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीकडे केली. या ग्राहकाला झोमॅटोने चांगलंच उत्तर दिलं आहे. 

मुंबई : मुंबईत ऑनलाईन जेवण मागविणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाप्रकारे एकेठिकाणी खाद्यपदार्थाची डिलिव्हरी हिंदू नसलेल्या व्यक्तीने नेली म्हणून चक्क ऑर्डर घेण्यास नकार दिला. ऑर्डर घेऊन येणारी व्यक्ती बदला अशी मागणी त्यांनी झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीकडे केली. या ग्राहकाला झोमॅटोने चांगलंच उत्तर दिलं आहे. 

खाद्यपदार्थांना कोणताही जाती-धर्म नसतो. खाद्यपदार्थांचा स्वतःचाच एक धर्म असतो. अशा आशयाचे उत्तर झोमॅटोने दिले आहे. हे उत्तर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या चांगलच पसंतीस उतरले आहे.  

३० जुलै रोजी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अमित शुक्ला या व्यक्तीने झोमॅटोवर खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. पण खाद्यपदार्थ घेऊन येणारी झोमॅटोची व्यक्ती हिंदू नसल्याचे समझताच त्यांनी त्याच्याकडून ऑर्डर घेण्यास नकार दिला. हा मुद्दा त्यांनी थेट त्यांच्या ट्विटर हँडलवरून उपस्थित केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  

 

अमित शुक्ला यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, त्यांनी माझ्या खाद्यपदार्थांची ऑर्डर पाठविण्यासाठी अहिंदू व्यक्तीची नेमणूक केली. त्यांनी ऑर्डर घेऊन येणारी व्यक्ती बदलण्यास नकार दिला. त्याचबरोबर ऑर्डर रद्द केल्यास पैशांचा परतावाही देण्यास नकार दिला. मग मी सुद्धा मला नको असलेल्या व्यक्तीकडून ऑर्डर स्वीकारण्याची जबरदस्ती तुम्ही माझ्यावर करू शकत नाही, असे त्यांना सांगितले.

शुक्ला यांच्या याच ट्विटला उत्तर देताना झोमॅटो इंडियाच्या अधिकृत हँडलवरून, खाद्यपदार्थांना कोणताही जाती-धर्म नसतो. त्यांच्या स्वतःचाच एक धर्म आहे, अशा आशयाचे उत्तर देण्यात आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News