मॉडेल होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलाचे करिअर एका कॉलमुळे उध्द्वस्त झाले...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

मुंबई : मॉडेल होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलाचे करिअर एका कॉलमुळे उध्द्वस्त झाले. या तरुणाला आयएमओ अ‍ॅपवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने मॉडेलिंगबाबत चर्चा करत, कपडे काढून बॉडी दाखविण्यास सांगितले. मॉडेल होण्याची संधी मिळेल या आशेने, तरुण विवस्त्रावस्थेतील व्हिडिओ देण्यास तयार झाला. कॉलधारकाने व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घेत फोन ठेवला. थोड्या वेळाने पुन्हा कॉल करत, तरुणाचा फेक आयडी तयार करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत, बिटकॉइनद्वारे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार कुर्ला येथे उघडकीस आला आहे.

कुर्ला परिसरात राहणारा 26 वर्षीय आकाश (नावात बदल) मॉडेलिंग कॉर्डिनेटरचे काम करतो. त्याच्या वडिलांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. परदेशातील एका नामांकित मॉडेलिंगच्या कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून ठगाने इन्स्टाग्रामवर आकाशशी ओळख करून घेतली व नंतर संपर्क वाढवला. त्याच ओळखीतून परदेशात मॉडेलिंगची संधी देण्याचे स्वप्न दाखवले. नंतर 17 तारखेला त्याच्या मोबाइलवर आयएमओ अ‍ॅपवरून त्याला कॉल आला. समोरच्या व्यक्तीने मॉडेलिंग करता का, याबाबत विचारणा केली. आकाशने होकार देताच, संपूर्ण बॉडी दाखविण्यास सांगितले. मॉडेल म्हणून संधी मिळेल या आनंदात आकाशने विवस्त्र होत बॉडी दाखवली.

कॉल करणाऱ्याने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर घेत, लवकरच कॉल करतो असे सांगितले. त्यानंतर ठरल्यानुसार पुन्हा कॉल केला. आकाशचे इन्स्टाग्रामवर बनावट नावाने खाते तयार केले असून, त्यात विवस्त्रावस्थेतील व्हिडिओ शेअर करणार असल्याची धमकी दिली. हा व्हिडिओ थांबवायचा असल्यास बिटकॉइनद्वारे पैशांची मागणी केली. रमेशने पैसे देण्यास नकार देताच ठगाने बनावट आयडीवरून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हिडिओ शेअर केला. तो पाहताच आकाशला मानसिक धक्का बसला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी थेट कुर्ला पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

फेक आयडीवरून तपासाची सूत्रे आरोपीने झहुर अल्ली सय्यद या नावाने इन्स्टाग्रामवर आकाशचे बनावट आयडी तयार केले आणि त्यावरूनच त्याचे व्हिडिओ शेअर केले. कुर्ला पोलिस सध्या याच आयडीच्या लिंकवरून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News