जाचक अटी कमी करा अन्यथा निवडणुका रद्द करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

महाराष्ट्रात महाविद्यालयीन निवडणुका तब्बल 27 वर्षांनी सुरू झाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत उमेदवारांसाठीच्या जाचक अटी कमी करा अन्यथा निवडणूक रद्द ठेवण्यात आल्या असल्याने या निवडणुका रद्द करा अशी मागणी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीणी फडणवीस यांच्या कडे केली आहे.

सोलापूर : महाराष्ट्रात महाविद्यालयीन निवडणुका तब्बल 27 वर्षांनी सुरू झाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत उमेदवारांसाठीच्या जाचक अटी कमी करा अन्यथा निवडणूक रद्द ठेवण्यात आल्या असल्याने या निवडणुका रद्द करा अशी मागणी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीणी फडणवीस यांच्या कडे केली आहे. 

महाविद्यालयीन निवडणुकीत विद्यार्थी उमेदवारांसाठी तो रिपीटर अथवा एटीकेटी नसावा अशा अटी घातल्या आहेत. दरम्यान, ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वी निवडणुकीची आचारसंहिता सुरु होईल. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयीन निवडणुका रद्द कराव्यात, अशीही मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेसप्रणित एनएसयुआय, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आणि शिवसेनाप्रणित भारतीय विद्यार्थी सेना, कोळी महासंघ, जनसेवा विद्यार्थी संघटना, मनसे विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनांचा समावेश आहे. या संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी, कुलगुरू डॉ. फडणवीस यांना निवेदन देऊन निवडणूक रद्दची मागणी केली आहे.

महाविद्यालयीन निवडणुकीत विद्यार्थी उमेदवारांसाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. पुर्वी ज्याप्रमाणे निवडणुका होत होत्या, त्या पध्दतीने निवडणुका घ्याव्यात. निवडणुकीतील खर्च गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी द्यावा.
-निशांत साळवे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, सोलापूर 

ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी आचारसंहिता लागेल. त्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयीन निवडणुका रद्द कराव्यात. प्राचार्य नियुक्त चार प्रतिपिधी निवडण्याचा अधिकार प्राचार्यांऐवजी त्याही निवडणुका खुल्या पध्दतीने घ्याव्यात. 
- गणेश डोंगरे, अध्यक्ष, एनएसयुआय, सोलापूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News