जाणून घ्या, फ्रुट्स आणि सॅलेड खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याची कारणे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 September 2019

फळांमध्ये उच्च प्रमाणात शुक्रोज, फ्रूकटोज आणि यीस्ट असते. या सगळ्याचा  पाण्याशी  संपर्क आला. तर ब्लोटिंगची समस्या उद्भवते. 

बऱ्याचदा आपल्या घरातील मोठी व्यक्ती आपल्याला फळे खाल्ल्यावर पाणी न पिण्याचा सल्ला देतात . परंतु त्या मागचे कारण स्पष्ट होत नाही. आणीन कारण कळालेच तरी आजची तरुणाई ह्याकडे  दुर्लक्ष करते. 

फळ खाणे हि सवय चांगली आहे. त्याने आरोग्य चांगले राहते. पण त्यावर पाणी प्यायले तर त्याचे दुष्परिणामही असतात.फळांमध्ये उच्च प्रमाणात शुक्रोज, फ्रूकटोज आणि यीस्ट असते. या सगळ्याचा  पाण्याशी  संपर्क आला. तर ब्लोटिंगची समस्या उद्भवते. 

फळ  किंवा सॅलेड खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे, अश्या समस्या निर्माण होतात. तसेच त्यावर पाणी प्यायले तर पाणी आणि असिडचा घोळ पोटात यीस्टसाठी विस्तार होण्यास मदत मिळते. परिणाम स्वरूप पोटात गॅस निर्माण होते. आणि  पोट फुगू लागते. फळांमध्ये अधिक प्रमाणात पाणी असल्याने पुन्हा पाणी प्यायले तर अतिसाराचा धोका वाढतो. म्हणून फळे आणि सॅलेड खाल्ल्यावर पाणी पिऊ नये.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News