...या कारणामुळे प्रियसीन कापल प्रियकराच गुप्तांग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • एका वर्षापासून शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय महिले सोबत, फकरु फजदुरु रहेमान खान (वय 30) याचे सुत जूळले.
  • महिलेने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करू लागल्याने दोघांमध्ये वाद झाला.
  • या रागातून तिने धारदार विळ्याने त्याच्या गुप्तांगावर वार केला.

ठाणे: प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे तिने आपल्या प्रियकराच्या गुप्तांगावर धारदार हत्याराने वार केल्याची घटना भिवंडी येथील केजीएम चौक, नवी वस्ती येथे शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्मान झाले होते.

एका वर्षापासून शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय महिले सोबत, फकरु फजदुरु रहेमान खान (वय 30) याचे सुत जूळले. शनिवारी रात्री फकरु तिच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. या वेळी महिलेने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करू लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. या रागातून तिने धारदार विळ्याने त्याच्या गुप्तांगावर वार केला. तो गंभीर गखमी झाला. 

शेजारील नागरिकांनी जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तिला पालिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून तिच्याशी प्रेमाचे नाटक करून शारीरिक उपभोग घेणाऱ्या फकरु विरोधातदेखील पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News