या कारणामुळे कुत्र्यानेच घेतला मालकाचा जीव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • पोलिसांचा सर्वत्र शोध सुरू होता. पण पोलिसांनाही मॅक यांच्या घरात प्रवेश करता येत नव्हता. त्या कुत्र्यांना चकवून कसेबसे पोलिस घरात दाखल झाले. तिथे काहीही पुरावे मिळाले नाहीत. अखेर घराच्या अंगणामध्ये पोलिसांना मॅक यांच्या कपड्यांचे तुकडे सापडले. 

डलास - कुत्रा हा माणसाचा मित्र मानला जातो आणि प्रसंगी स्वत:चा जीव पणाला लावत ते मालकाचं रक्षणही करत असतात.. पण स्वत:च पाळलेल्या कुत्र्यांनी मालकाचा जीव घेतल्याची भीषण घटना अमेरिकेत घडली आहे. 

गेल्या मंगळवारी ही घटना उघडकीस आली. 57 वर्षीय फ्रेडी मॅक गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होते. पोलिस कसोशीनं त्यांचा शोध घेत होते. व्हिनस या एका छोट्या गावामध्ये मॅक राहत होते. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार मे महिन्यामध्ये दाखल केली होती. मॅक यांची प्रकृती नाजूक होती. अनेक दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाईक मॅक यांच्या घरी गेले. पण मॅक यांनी पाळलेल्या 18 कुत्र्यांनी कुणालाही घरात घुसू दिले नाही. 

पोलिसांचा सर्वत्र शोध सुरू होता. पण पोलिसांनाही मॅक यांच्या घरात प्रवेश करता येत नव्हता. त्या कुत्र्यांना चकवून कसेबसे पोलिस घरात दाखल झाले. तिथे काहीही पुरावे मिळाले नाहीत. अखेर घराच्या अंगणामध्ये पोलिसांना मॅक यांच्या कपड्यांचे तुकडे सापडले. 

वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या कुत्र्यांच्या विष्ठेमध्ये मॅक यांच्या हाडांचे अवशेष, केस आणि कपड्यांचे तुकडे सापडले. दरम्यानच्या काळात त्या शेतामध्येच पोलिसांना हाडांचे तुकडेही सापडले. वैद्यकीय चाचणीनंतर हे सर्व अवशेष मॅक यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. 

मॅक यांनी मिश्र प्रजातींचे 18 कुत्रे पाळले होते. त्यांचे स्वत:च्या कुत्र्यांवर प्रचंड प्रेम होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मॅक यांना कुत्र्यांनीच ठार मारले की आजारपणामुळे मृत्यु झालेल्या मॅक यांचा मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मॅक यांच्या 18 कुत्र्यांपैकी दोघांना इतर कुत्र्यांनी ठार मारले. उर्वरित कुत्र्यांपैकी 13 जण नरभरक्षक आणि अतिआक्रमक झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांद्वारे ठार करण्यात आले. उरलेल्या तीन कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी जाहीरात देण्यात आली आहे.

 कुत्रा हा माणसाचा मित्र मानला जातो आणि प्रसंगी स्वत:चा जीव पणाला लावत ते मालकाचं रक्षणही करत असतात.. पण स्वत:च पाळलेल्या कुत्र्यांनी मालकाचा जीव घेतल्याची भीषण घटना अमेरिकेत घडली आहे. 

गेल्या मंगळवारी ही घटना उघडकीस आली. 57 वर्षीय फ्रेडी मॅक गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होते. पोलिस कसोशीनं त्यांचा शोध घेत होते. व्हिनस या एका छोट्या गावामध्ये मॅक राहत होते. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार मे महिन्यामध्ये दाखल केली होती. मॅक यांची प्रकृती नाजूक होती. अनेक दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाईक मॅक यांच्या घरी गेले. पण मॅक यांनी पाळलेल्या 18 कुत्र्यांनी कुणालाही घरात घुसू दिले नाही. 

पोलिसांचा सर्वत्र शोध सुरू होता. पण पोलिसांनाही मॅक यांच्या घरात प्रवेश करता येत नव्हता. त्या कुत्र्यांना चकवून कसेबसे पोलिस घरात दाखल झाले. तिथे काहीही पुरावे मिळाले नाहीत. अखेर घराच्या अंगणामध्ये पोलिसांना मॅक यांच्या कपड्यांचे तुकडे सापडले. 

वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या कुत्र्यांच्या विष्ठेमध्ये मॅक यांच्या हाडांचे अवशेष, केस आणि कपड्यांचे तुकडे सापडले. दरम्यानच्या काळात त्या शेतामध्येच पोलिसांना हाडांचे तुकडेही सापडले. वैद्यकीय चाचणीनंतर हे सर्व अवशेष मॅक यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. 

मॅक यांनी मिश्र प्रजातींचे 18 कुत्रे पाळले होते. त्यांचे स्वत:च्या कुत्र्यांवर प्रचंड प्रेम होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मॅक यांना कुत्र्यांनीच ठार मारले की आजारपणामुळे मृत्यु झालेल्या मॅक यांचा मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मॅक यांच्या 18 कुत्र्यांपैकी दोघांना इतर कुत्र्यांनी ठार मारले. उर्वरित कुत्र्यांपैकी 13 जण नरभरक्षक आणि अतिआक्रमक झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांद्वारे ठार करण्यात आले. उरलेल्या तीन कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी जाहीरात देण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News