प्रत्येक टप्प्यावर येणारा अनुभव हाच खरा गुरु: पोलिस आयुक्त अंकुश शिंदे

परशुराम कोकणे
Tuesday, 16 July 2019
  • लहानपणी वडील आणि त्यांच्या मित्राकडून मला खूपकाही शिकता आले. त्यांनी केलेल्या संस्काररुपी मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाटचाल करता आली

सोलापूर: आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर येणारा अनुभव हाच खरा गुरु आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनुभवातून मी घडत गेलो. लहानपणी वडील आणि त्यांच्या मित्राकडून मला खूपकाही शिकता आले. त्यांनी केलेल्या संस्काररुपी मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाटचाल करता आली, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. 

पोलिस आयुक्त शिंदे म्हणाले, "माझे वडील (स्व.) रामराव ऊर्फ रामभाऊ शिंदे हे माझे पहिले गुरु. त्यांच्याकडून मला खूपकाही शिकता आले. होळगाव (ता. आंबेजोगाई जि. बीड) येथे आमची शेती आहे, वडीलांनी शेतकरी म्हणून जगताना संस्काराला महत्व दिले. शेतात रोजंदारीवर काम करणारे विठ्ठल कांबळे हे आमच्या वडीलांचे खास मित्र. शिंदे आणि कांबळे कुटूंब एकत्रच राहायला होते. कांबळे यांच्याकडून मला माणसाने कसे राहावे, कसे बोलावे हे शिकता आले. त्यांनी माझ्यावर गुरुंप्रमाणे संस्कार केले. कोणतीही परिस्थीती असली तरी माणसाने शांत राहणे महत्वाचे असल्याचे मला त्यांच्याकडून शिकता आले.' 

पाचवीनंतर मला शाळेत श्री. मापारी नावाचे वर्गशिक्षक होते. चिकाटीने मागे लागून मापरे गुरुजी अभ्यास करून घ्यायचे. शिक्षणासोबतच त्यांनीही संस्कारालाही महत्व दिले. कॉलेजनंतर प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अनुभवातून मी घडत गेलो. मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेतले. 1990 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून पोलिस दलात दाखल झाल्याचे पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले. 

आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अनुभवाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. माझ्या मते अनुभव हा चांगला गुरु आहे. आजवरच्या वाटचालीत आलेल्या अनुभवातून खूपकाही शिकता आले. 
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News