‘केजीएफ २’मध्ये रवीना? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 28 February 2019

गेल्या वर्षी ‘केजीएफ’ या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. हा चित्रपट हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता ‘केजीएफ २’ बनवण्याचाही चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी निर्णय घेतला आहे.

‘केजीएफ’च्या दुसऱ्या भागात बॉलीवूडचे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला या चित्रपटासाठी फायनल करण्यात आलं असल्याची चर्चा होती. आता अभिनेत्री रवीना टंडनचंही नाव ‘केजीएफ२’शी जोडलं गेलं आहे. रवीनालाही या चित्रपटासाठी विचारलं आहे.

‘केजीएफ’च्या पहिल्या भागात दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसला होता. चित्रपटामधील ॲक्‍शन सीन्स आणि तांत्रिक गोष्टींची सगळीकडेच वाहवा झाली. प्रशांत नील यांनी ‘केजीएफ’च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शनही उत्तमरीत्या केलं. आता ‘केजीएफ२’ला बॉलीवूड कलाकारांचीही साथ लाभणार आहे. रवीना हा चित्रपट करण्यास ग्रीन सिग्नल देते का, हे पाहावं लागेल. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News