रशिद खान बनला अफगाणिस्तानचा नवा कर्णधार !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर टाकले पाऊल
  • अफगाणिस्तानला स्पर्देत एकही सामना जिंकता आला नाही
  • आता सप्टेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळणार

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाने फिरकी गोलंदाज रशिद खान याला क्रिकेटच्या तीनही प्रकारासाठी कर्मधारपदी नियुक्त करून मोठे पाऊल टाकले आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अगदी ऐनवेळी अफगाणिस्तानने असघर अफगाणकडून नेतृत्व काढून घेत गुलबदिन नईबची घोषणा केली होती. मात्र, या नियुक्तीबाबत संघात नाराजी होती. त्याचे परिणाम कमी अधिक प्रमाणात विश्‍वकरंडक स्पर्धेच्या कामगिरीवर उमटले. अफगाणिस्तानला स्पर्देत एकही सामना जिंकता आला नाही. 

अफगाणिस्तान संघ निवड समितीचे अध्यक्ष दवलत खान अहमदझाई म्हणाले,"विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वच संघ तुल्यबळ आणि अनुभवी होते. यानंतरही आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. विजयापर्यंत पोचण्यासाठी प्रत्येक खेळाडूने योगदान दिले. पण, आम्ही दुर्दैवी ठरलो. विश्‍वकरंडक स्पर्धेतील कामगिरी प्रेरणा मानून आम्ही पुढे जाऊ. यासाठी संघात काही बदल करण्यात आले. त्यानुसार आम्ही नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला.'' 

अफगाणिस्तान संघ आता सप्टेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर तेथेच ते बांगलादेश, झिंबाब्वेसह तिरंगी एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. त्यानंतर ते वेस्ट इंडिज अफगाणिस्तानचा दौरा करणार असून, यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामना होईल. ही मालिका भारतात खेळविली जणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News