कल्याणच्या तरुणाने पत्रीपुलावर बनवलेला रॅप सॉंग व्हायरल; विधानसभा निवडणूकांवर परिणाम?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 13 September 2019
  • ‘कब बनेगा पत्रीपुल’? कल्याणकर तरुणांनी रखडलेल्या पत्रीपुलावर बनवले रॅप सॉंग
  • रॅप सॉंग सोशल मीडियावर व्हायरल 
  • याचा परिणाम आगामी विधानसभेवर? 
     

मुंबई: गेल्या वर्षभरापासून कल्याणमधील पत्रीपूलाचे काम रखडले असून संत गतीने सूरु आहे. धोकादायक असलेला ब्रिटिशकालीन पत्रीपुल तोडल्यानंतर त्या जागी नव्याने पूल उभारण्याचे काम हाती घेन्यात आले. रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाबाबत विविध राजकीय पक्ष , सामाजिक संघटना आंदोलन करीत असताना आता कल्याणच्या तरुणांनी रॅप सॉंग बनवत या समस्येला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे. हे रॅप सॉंग यु ट्यूबवर अपलोड करण्यात आले असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कल्याणकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच त्रासाचा बनलेल्या पत्रीपुलबाबत आजपर्यंत अनेक आंदोलन झाली आहेत. या पुलाचे काम पूर्ण व्हावे म्हणून अनेक सामाजिक संघटनांही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामध्ये आता या तरुणांच्या रॅप सॉंगची भर पडली असून या गाण्यातून संबंधित तरुणाने ‘पत्रीपुल कब बनेगा’ असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी आपण असाच लढा सुरू ठेवणार असून जो हा पूल पूर्ण करेल त्याला येत्या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहनही या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याचजोडीला दररोज या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासालाही या गाण्याच्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली आहे. आगामी विधानसाभा निवडणूकिच्या तोंडावर यूट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News