आलियासोबत काम करण्यास रणवीरचा नकार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 October 2019

'गंगूबाई' चित्रपट करण्याचा विचार केला आहे. मात्र या  चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्याची निवड होणं बाकी होतं.

'गली बॉय ' चित्रपटाच्या  यशानंतर  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी सोबत काम केले.  मात्र आता रणवीर सिंगने पुन्हा एकत्र काम  करण्यास नकार दिला आहे. रणवीरने नकार दिल्याने आलिया ही  नाराज असल्याचे समजते. 

 आलिया आणि सलमान खान यांचा 'इंशाअल्लाह' चित्रपटाच्या अपयशानंतर  भन्साळी यांनी आलिया सोबत  'गंगूबाई' चित्रपट करण्याचा विचार केला आहे. मात्र या  चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्याची निवड होणं बाकी होतं. मुंबई मिररच्या वृत्तानुसार या मुख्य भूमिकेसाठी रणवीरलाच भन्साली यांची पहिली पसंती होती. यासंदर्भात रणवीरसोबत बोलणंही झालं परंतू रणवीरनं चित्रपट करण्यास साफ नकार दिला. 

रणवीरनं नकार देण्याचं कारणही स्पष्ट न केल्यानं आलिया त्याच्यावर नाराज आहे.
'गंगुबाई' मध्ये कामाठीपुरातील महिलेची कथा दाखवण्यात येणार असून चित्रपटाची कथा लेखक हुसैन जैदी लिखीत 'माफिया क्वींस ऑफ मुंबई' पुस्तकातील एका भागावर आधारित असणार आहे.आलिया सध्या तिच्या वडिलांच्या 'सडक २' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्याचप्रमाणे ती करण जोहरच्या 'तख्त' तर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News