कपिल देवची भूमिका साकारताना रणवीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

रणवीर सिंगने यंदा त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. त्याने ‘८३’ या आगामी चित्रपटामधील फर्स्ट लूक शेअर केला.

रणवीर सिंगने यंदा त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. त्याने ‘८३’ या आगामी चित्रपटामधील फर्स्ट लूक शेअर केला.

या चित्रपटात रणवीर क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या फोटोमध्ये तो हुबेहूब कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे. रणवीरने त्याच्या लूकमध्ये केलेले बदल खरंच कौतुकास्पद आहेत.

सध्या रणवीरचा हा लूक सोशल मीडियावर बहुचर्चित ठरत आहे. रणवीरने ‘८३’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चित्रपटसृष्टीमधील दिग्गज व्यक्तींनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले. रणवीरचा लूक पाहता ‘८३’ चित्रपटाबाबत सिनेरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News