"स्वराज्यरक्षक संभाजी" या मालिकेतील राणूआक्‍काचा 'न्यू लूक'; पाहा कसा दिसतोय..!

विशाल पाटील, सातारा 
Saturday, 3 August 2019

"स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून राणूआक्‍काची भूमिका साकारणारी सातारा जिल्ह्यातील सुप्रसिध्द अभिनेत्री म्हणजेच आश्‍विनी महांगडे. आता ती नव्या लूकमध्येही लवकरच दिसणार आहे. वाई (जि. सातारा) येथील सिनेमा फोटोग्राफर निलेश बाबर याने तिचे हटके लूकमधील फोटो काढले आहेत. ते तुमच्यासाठी... 

सुप्रसिध्द ठरलेली मालिका म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी..! विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे हे कोरेगाव तालुक्‍यातील सोनक्‍याचे. संभाजीराजेंची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांच्याबरोबर काम करणारी बहुतांश टिमही सातारा जिल्ह्यातीलच आहेत.
 

त्यातील एक विशेष पात्र म्हणजे राणूआक्‍का. राणूआक्‍का म्हंटले की तीचं ते भरदारी रुप सर्वांच्या सामोरे येते. आश्‍विनी महांगडे ही सातारा जिल्ह्यातील वाईची. तीचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पसरणी येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण वाईच्या किसन वीर महाविद्यालयात झाले.

पसरणी गावच्या यात्रेत मित्र-मैत्रिणी नाटक करायच्या, ती वडिलांमुळे नाटकांकडे वळली होती. कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हलमध्ये अनेक एकांकिका, नृत्य स्पर्धांत तीने चमकदार कामगिरी केलेली.
 

तिच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेले "यदा कदाचित' हे तिच्या आयुष्यातील पहिलं नाटक. वाईतील नृत्यांकूर कलामंचमध्ये ती डान्सही करायची.
 

संभाजीराजे मालिकेमुळे तिच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. आता ती राणूआक्‍का म्हणून सर्वपरिचित बनली आहे. आता विविध मालिकांमध्येही गुणी अभिनेत्री दिसणार आहे आणि तीही नव्या लूकमध्ये. तिचे फोटोशूट केले आहे निलेश बाबर याने. मेकअप केला आहे प्रियंका देशमुख यांनी. ते शूट पुण्यातील रॉयल कारभार यांनी ऑर्गनाइज केले होते. ते तुम्हाला नक्‍कीच आवडतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News