दिग्दर्शक लव रंजनच्या चित्रपटातून रणबीर- दीपिका पुन्हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

चित्रपटाची कथा रोमॅंटिक आणि कॉमेडी असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षीपासून सुरुवात होणार आहे.

'तमाशा' चित्रपटानंतर रणबीर आणि  दिपिका  यांची जोडी प्रेक्षकांसमोर आली नाही. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांसाठी ते एकत्र काम करत असल्याची चर्चा सिनेसृष्टीत सुरु आहे. दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाचे नाव मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा रोमॅंटिक आणि कॉमेडी असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षीपासून सुरुवात होणार आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News