भाजपमध्ये मेगाभरतीचं दुसरं पर्व सुरु: राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता भाजपमध्ये जाणार? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019

सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून रामराजे नाईक निंबाळकरांना ओळखलं जातं. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कातील राष्ट्रवादीचा मोहरा भाजपात गेला, तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात भुईसपाट होईल, असेच अंदाज लावले जात आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. भाजपमध्ये मेगाभरतीचं दुसरं पर्व सुरु होण्याचे संकेत प्रसाद लाड यांनी दिल्यानंतर काही तासातच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर  भाजपचा झेंडा हाती धरण्याची शक्यता आहे. याबाबत टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून रामराजे नाईक निंबाळकरांना ओळखलं जातं. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कातील राष्ट्रवादीचा मोहरा भाजपात गेला, तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात भुईसपाट होईल, असेच अंदाज लावले जात आहेत.

राष्ट्रवादीची साथ सोडण्याचे कारण :

रामराजे निंबाळकर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील राजघराण्याशी संबंधित आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र दोघांमध्ये असलेल्या मतभेदांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तोडगा काढता न आल्याने रामराजे निंबाळकर गेल्या काही काळापासून नाराज आहेत. त्यामुळे निंबाळकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News