पंढरपुरात राम कदमांना साडीचोळी अन् बांगड्यांचा आहेर, पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • आ.राम कदम यांना साडी चोळी भेट
  • राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी केला निषेध

 

पंढरपूर : भाजप आमदार महिलांचा अवमान करत असल्याच्या निषेधार्थ आज (ता. 06) येथील महिला राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी आ. राम कदम यांना  साडी चोळी आणि बांगड्याचा आहेर देऊन निषेध केला. यावेळी आमदार राम कदम भाजप सरकार हाय..हाय अशा घोषणा देण्यात आल्या.

 

 

राम कदम नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वी
दहिहंडी उत्सवाच्या गर्दीसमोर भाजपचे आ. राम कदम यांनी जोशात येऊन वादग्रस्त वक्तव्य केले होतं. जोशातच त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला. गर्दीसमोर कोणतेही काम असल्यास आपल्याला संपर्क साधू शकता असे सांगत राम कदम यांनी आपला मोबाइल क्रमांक जाहीर करून टाकला. शिवाय, तरुणांना सल्ला देताना त्यांचे भान सुटले. तरुणांना कशी मदत करणार हे सांगताना कदम म्हणाले, 'एखाद्या तरुणीला प्रप्रोज केलं आणि ती नाही म्हणतेय, प्लीज मदत करा. मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचे. तुमचे आई-वडील म्हणाले, साहेब ही मुलगी पसंत आहे तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार...' या वक्तव्यांमुळे भाजपचे राम कदम वादात सापडले होते.

राम कदम यांचे अपहरणाचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीकास्त्र सुरू झाले. सोशल मीडियात याचे जोरदार पडसाद उमटले. नेटकऱ्यांनी राम कदम यांना ट्रोल केले. राम कदम यांच्यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर, त्यांनी याबद्दल माफीही मागितली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News