लिपलॉक किसिंगमुळे रकुल प्रीत सिंग चर्चेत; व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

कधी कोणता चित्रपट चर्चेत येईल किंवा त्या चित्रपटातील सीन चर्चेत येईल काही सांगता येत नाही. असाच दाक्षिणात्य चित्रपटातील एका सीनची सध्या चर्चा होत आहे.

कधी कोणता चित्रपट चर्चेत येईल किंवा त्या चित्रपटातील सीन चर्चेत येईल काही सांगता येत नाही. असाच दाक्षिणात्य चित्रपटातील एका सीनची सध्या चर्चा होत आहे. नुकताच हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. या चित्रपटाचे नाव मनमधुडू २ असे आहे तर या चित्रपटात नागार्जुन आणि रकुल प्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

पण  चित्रपटातील एक सीन चांगलाच वादात अडकला आहे. तर यात एक लीपलॉक सीन आहे. हा सीन चर्चेत यायचे कारण असे आहे की, रकुल प्रीत सिंगने  तिच्या महिला सहकलाकारासोबत लीप लॉक सीन दिला आहे. यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मई श्रीपादाचे पती राहुल रविंद्रन यांनी केले आहे.

#chinmayi where you at amma...#deeplydisturbing https://t.co/gBxyqFHfvC

यामुळे चित्रपटाला  प्रेक्षकांनी  चिन्मईला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. पण मनमधुडू २ या चित्रपटाच्या ट्रेलरचे काही दिवसांपूर्वी चिन्मईने कौतुक केले होते. याच कौतुकमध्ये रकुल स्मोकिंग करत असताना दाखवण्यात आले होत, त्यामुळे प्रेक्षक तिच्यावर प्रचंड चिडले होते. पण याच सीनमुळे चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. 

#deeplydisturbing pic.twitter.com/XfYS9eqBpE

रकुल प्रीत सिंगने काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या "दे दे प्यार दे" या चित्रपटात अजय देवगण, तब्बूसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले होते.  तिच्या या चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांनी प्रेम मिळाले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News