राजू शेट्टी, रविकांत तुपकर कृष्णकुंजवर; विधानसभेसाठीचा प्लॅन ठरला?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • राजु शेट्टी व रविकांत तुपकर राज ठाकरेंच्या भेटीला
  • राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाजवळ आल्या असुन, सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व विरोधी पक्षनेते एकत्र येऊन सत्ताधरी भाजप आणि सेनेला सत्तेतून हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येतंय. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले या मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाहून अधिक मताने मात केली. 

विधानसभा निवडणुकींच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत 1 तासाहून अधिक वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्या. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत भारतीय जनता पक्षाला हरविणार असल्याची भुमिका मांडली असून त्यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत राहणार की नाही हे काही दिवसांनी समोर येईल.

 

दरम्यान स्वभिमानीने विधानसभा स्वबळावर लढायची की आघाडीतून ह्याचा निर्णय अजुन झालेला नाही. राजू शेट्टी यांनी पराभवाच्या पार्श्वभूमीवर कवितेच्या माध्यमातून खचून न जाता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इरादा व्यक्त केला होता. ‘आजपासून..’ या शीर्षकाच्या कवितेद्वारा शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी "नसलो तरी चळवळीला बांधील असून मी संत नाही शांत आहे ,गोतावळ्यातून दुरावलो , याची मनात खंत आहे, "असे म्हटले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News