राजकुमार राव - मौनी रॉयच्या ‘मेड इन चायना’ ची तारीख पुढे ढकलली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

 मेड इन चायना’ या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव आणि मौनी रॉय पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटामधील दोघांचेही लूक प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ३० ऑगस्टला प्रदर्शित होणारा हा चित्रपट काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.

मुंबई  :  ‘मेड इन चायना’ या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव आणि मौनी रॉय पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटामधील दोघांचेही लूक प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ३० ऑगस्टला प्रदर्शित होणारा हा चित्रपट काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.

राजकुमारनेच एका मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘सध्या तरी या चित्रपटाचे निर्माते चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख फायनल करण्यामध्ये व्यस्त आहेत. कारण हा एक स्पेशल आणि हटके चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख संपूर्ण विचार करूनच ठरवण्यात येईल.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News