राष्ट्रपती राजवटीवर राज ठाकरे काय म्हणाले ? पाहाच

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे याबाबतचा अहवाल पाठविला होता.

मुंबई- राज्यात सत्तेचा तिढा कायम असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रीय समोर येत आहेत. त्यातच नेहमी चर्चेत असणारे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे कडवी टिका केली आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे याबाबतचा अहवाल पाठविला होता.  त्यांनी ट्विटरवरून याबाबतचे निवेदन देत घटनेनुसार राज्य चालविणे कठीण असल्याचे म्हटले आहे. राज्यातील कलम 356 लागू करण्याची स्थिती असल्याचेही राज्यापालांनी म्हटले होतं. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करेपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ हे निश्चित मानण्यात येत होतं. 

राष्ट्रपती राजवट म्हणजे हा राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांची मुदत रात्री साडे आठ वाजता संपत आहे. त्यापूर्वीच राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविन यांच्याकडून आता या शिफारसीवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची ही तिसरी वेळ आहे. राष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रीया राज ठाकरे यांनी दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News