सनई-चौघड्यांच्या मंजूळ सुरात... 'राज'पूत्र लग्नाच्या बेडीत

YIN BUZZ TEAM
Sunday, 27 January 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मिताली बोरूडे यांचा शुभविवाह लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे पार पडला. या विवाहसोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मिताली बोरूडे यांचा शुभविवाह लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे पार पडला. या विवाहसोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली.

या विवाहसोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, जयदेव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, आशिष शेलार, प्रसाद लाड, अमित देशमुख या राजकीय व्यक्तींसोबतच रतन टाटा, सचिन तेंडुलकर, आशा भोसले, आमिर खान, रितेश देशमुख यांच्यासोबत अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली दिसून आली. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.

लग्नाचा मुहूर्त दुपारी 12 वाजून 51 मिनिटांचा होता. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी आप्तेष्टांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पडला. राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आणि परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले आहे. कृष्णकुंजवर लग्नाची धावपळ जोरात सुरु होती आणि मान्यवरांची वर्दळ दिसून येत होती. तसेच, अमित आणि मितीलीच्या वैवाहिक जीवनात सुख आणि शांती लाभावी या साठी आज ठाण्यात कोपीनेश्वर मंदिर येथे मनसे पदाधिकाऱ्यांनी शंकराच्या पिंडीला अभिषेक करून गणपतीला देखील दुग्धाभिषेक केला, त्यानंतर आरती देखील करण्यात आली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News