पावसाळ्यात "कुल' दिसण्यासाठी फॅशन टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

पावसाळ्यात आपली जीवनशैली हमखास बदलते; परंतु दिवसेंदिवस त्यामध्ये वेगवेगळे बदल होत आहे. नवनवीन फॅशन बाजारात येत आहेत. पावसाळा म्हटले की रेनकोट, वेगवेगळ्या छत्र्या विविध प्रकारची बूट, चप्पल हे आलेच. पण, पावसात सगळीकडे  चिखल झालेला असतो, पाणी साचलेलं असतं वाहतूकीचाही खोळंबा झाला असतो अशा वेळी घरातून चांगले कपडे घालून  निघणं नकोसं वाटतं. पण काही स्मार्ट फॅशन टिप्सद्वारे तुम्ही पावसातही ट्रेंडी दिसू शकता. 

- पावसासाठी  तुम्ही शॉपिंग करत असाल तर शक्यतो पॉप अप रंग निवडा. जास्त उठावदार गडद रंगाना प्राधान्य द्या. हे रंग या मौसमात उठून दिसतात.
- फिकट रंगाचे कपडे आवर्जून टाळा, कारण पावसात चालताना चिखल उडतो. फिकट रंगावर चिखलाचे डाग सहज दिसून येतात त्यामुळे  फिकट कपडे घालणं आवर्जून टाळा. 
- याव्यतिरिक्त पायघोळ कपडे घालणं  शक्यतो टाळा. स्कर्ट, शॉर्ट ड्रेसनां प्राधान्य द्या. पाणी साचलं असेन तर कपडे खराब होण्याची शक्यता कमी असते. 

- या मौसमात कॉटन, पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेले कपडे निवडा. कारण हे कपडे पटकन सुकतात. 
- एक छानशी छत्री नक्की घ्या. खरं तर छत्री आणि स्टाईलचा संबध काय असं तुम्ही म्हणाल. मात्र हल्ली मोठ्या छत्र्यांचा ट्रेंड आला आहे. या छत्र्या विविध रंग, प्रिंट आणि स्टाईलमध्ये उपलब्ध असतात. या ट्रेंडी छत्र्या तुम्हाला नक्कीच स्टाईलिस्ट बनवतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News