पावसाने मुंबईला झोडपलं; लोकल, रस्ते, हवाई वाहतूक विस्कळीत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

मुंबई : गेल्या आठ्वड्याप्रमाणे या आठवड्यातही सुरुवातीला पावसाने झोडपले आहे. शहर-उपनगरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा रेल्वे, हवाई तसेच वाहतूक कोंडी झाली आहे. हवामानात देखील मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे. अजून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मालाड, अंधेरी, वांद्रे, लालबाग, परळ, मिरा रोड परिसरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिरानं धावत आहे.

बेस्ट वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. विमान वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली होती. मुंबईसह कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News