कोकण परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात रायगड पोलिस मानकरी ठरले
अलिबाग : कोकण परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा नुकताच रत्नागिरीमध्ये झाला. या मेळाव्यात रायगडच्या पोलिसांनी 11 पदके मिळवून यश संपादन केले आहे. त्यात चार सुवर्ण तर चार रौप्य पदकाचे मानकरी रायगड पोलिस ठरले आहेत. कोकण परिक्षेत्र विभागातील रायगडसह अन्य जिल्ह्यातील निवडक पोलिसांचा कर्तव्य मेळावा रत्नागिरीत आयोजित केला होता. मेळाव्यात स्पर्धांमध्ये गुन्हे तपासातील वैज्ञानिक उपयोगीता या प्रकारात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार स्वप्नील येरुणकर यांनी यश संपादन केले.

या वेळी त्यांना रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. स्वप्नील येरुणकर हे रेवदंडा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या रायगडच्या गुन्हे शाखा विभागात कार्यरत आहेत. नोकरी सांभाळत त्यांनी एमपीएसपी परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. त्यांची पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली.
विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र विभागात येणाऱ्या रायगड, रत्नागिरी, ठाणे ग्रामीण, पालघर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील काही निवडक पोलिसांसाठी 17 व्या परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यात हा मेळावा 5 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये शंभरहून अधिक पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. कर्तव्य मेळाव्यामध्ये प्रात्यक्षिक व लेखी चाचणी कर्मचाऱ्यांची घेण्यात आली.