रायगड : डिजिटल शाळांचे स्वप्न अजून प्रतिक्षेत

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 16 November 2019

रायगड : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अध्ययन-अध्यापनाबरोबर शालेय सर्वांगीण विकासासाठी आता विज्ञान-तंत्रज्ञानाची बहुमूल्य साथ मिळाली आहे. तसेच डिजिटल इंडियाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शहरातील अनेक बहुतांश शाळेत अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व शालेय व्यवस्थापन या तीन पद्धतीचे कामकाज नियमित सुरू असते. त्यामुळे अशा शाळांना डिजिटल शाळा संबोधले जाते; मात्र डोंगर-दऱ्यांनी व्यापलेल्या रायगड जिल्ह्यात डिजिटल शाळा निर्मितीसाठी अनेक तांत्रिक, नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येताना दिसत आहेत.

रायगड : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अध्ययन-अध्यापनाबरोबर शालेय सर्वांगीण विकासासाठी आता विज्ञान-तंत्रज्ञानाची बहुमूल्य साथ मिळाली आहे. तसेच डिजिटल इंडियाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शहरातील अनेक बहुतांश शाळेत अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व शालेय व्यवस्थापन या तीन पद्धतीचे कामकाज नियमित सुरू असते. त्यामुळे अशा शाळांना डिजिटल शाळा संबोधले जाते; मात्र डोंगर-दऱ्यांनी व्यापलेल्या रायगड जिल्ह्यात डिजिटल शाळा निर्मितीसाठी अनेक तांत्रिक, नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे १०० टक्के शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न आजही अधांतरी आहे. 

जिल्ह्यात एकूण २ हजार ७४१ शाळांपैकी केवळ ६७ शाळा डिजिटल होणे शिल्लक आहे; मात्र या शाळा अतिदुर्गम भागात असल्याने इंटरनेट सुविधा, वीजजोडणी अशा अडचणींमुळे या शाळा डिजिटल होण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०० टक्के शाळा डिजिटल करण्याचे जिल्हा परिषदेचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. महाराष्ट्र सरकारच्या शालेय विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळा सिद्धी या उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही, ई-लर्निंग, ई-क्‍लास या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना डिजिटल स्वरूप देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. काळानुसार शाळा अत्याधुनिक व डिजिटल होणे सध्याची गरज असल्याचे ओळखून शिक्षक, पालक, ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी व लोकप्रतिनिधींनी आपापल्या परिसरातील शाळा डिजिटल करण्यासाठी योगदान देत आहेत.

शाळा डिजिटल झाल्याने अध्ययन अध्यापन रंजक व क्रियाशील होते. याबरोबरच शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो. कमी कालावधीत अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे जाते; मात्र जिल्ह्यात शाळा डिजिटल करण्यासाठी अनेक अडचणीही येत आहेत. काही गावांमध्ये वीज असतानाही प्राथमिक शाळांना विजेचे बिल भरणे परवडत नसल्याने शाळा डिजिटल करता येत नाहीत; तर काही ठिकाणी इंटरनेटच नाही. अशा वेळी पाठ्यपुस्तकावरील बारकोडदेखील स्कॅन करून दाखविता येत नाही. 

जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांमध्ये आजघडीला ई-लर्निंगसाठी आवश्‍यक असलेले संगणक, मोबाईल, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, प्रोजेक्‍टर, इंटरॲक्‍टिव बोर्ड इत्यादी विविध प्रकारची सर्व इलेक्‍ट्रॉनिक साधने कमी-अधिक प्रमाणात आहेत; मात्र याचा वापर प्रभावीपणे होताना दिसत नाही. काही ठिकाणी ही साधने नादुरुस्त आहेत किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा वापर करणे शक्‍य नाही. त्यामुळे डिजिटल शाळांसाठी व्यत्यय निर्माण होतो. डिजिटल शाळा करण्यासाठी वेगवान इंटरनेट सेवा, वीजजोडणी, योग्य साधनांची उपलब्धता करून देणेही आवश्‍यक आहे. त्या जोडीला शिक्षकांना या साधनांचे योग्य प्रशिक्षण, पुरेशी संसाधने व सकारात्मक पाठबळ मिळाल्यास जिल्ह्यातील उर्वरित शाळादेखील डिजिटल होऊ शकतील, हे निर्विवाद सत्य आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News