राहुल गांधींमुळेच काँग्रेसमध्ये राजीनामासत्र; पाहा कोण म्हणतंय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाटकाचे पडसाद आज संसदेत उमटले. आमदारांच्या फोडाफोडीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर उत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्यांचे राजीनामे सुरू झाल्याची लगावलेली कोपरखळी काँग्रेस खासदारांना घायाळ करून गेली. 

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाटकाचे पडसाद आज संसदेत उमटले. आमदारांच्या फोडाफोडीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर उत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्यांचे राजीनामे सुरू झाल्याची लगावलेली कोपरखळी काँग्रेस खासदारांना घायाळ करून गेली. 

कर्नाटकमध्ये डळमळीत असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दल- काँग्रेस आघाडीतील डझनभर आमदार राजीम्याच्या घोषणेनंतर मुंबईत पोहोचल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे. काँग्रेसने या राजकीय संकटावर लोकसभेमध्ये चर्चेसाठी कार्य स्थगन प्रस्तावाची नोटीसही दिली होती. लोकसभाध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर शून्य काळात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी कर्नाटकच्या घडामोडींवरून भाजपवर तोफ डागली.  

कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी दलबदलू आमदारांना हाताशी धरून षड्‌यंत्र केले जात आहे. राज्यांमधील विरोधी पक्षांचे सरकार भाजपला सहन होत नाही, असा हल्ला अधीर रंजन चौधरींनी चढवला. राजनाथसिंह यांनी हे आरोप नाकारताना कर्नाटकमध्ये जे काही सुरू आहे त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही, असे स्पष्ट केले.   ते म्हणाले, की राजीनाम्याचे सत्र आमच्यामुळे नव्हे, तर राहुल गांधींमुळे सुरू झाले आहे. राजनाथसिंह यांच्या चिमट्यामुळे काँग्रेस खासदारांनी लोकशाही बचाओचे फलक झळकावले.

राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या १० जुलै रोजी अमेठीचा दौरा करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. निवडणुकीतील पराभवानंतर राहुल यांचा पहिलाच अमेठी दौरा असणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गांधी हे अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी
भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस गोटात खळबळ माजली आहे. एकीकडे नेत्यांचे राजीनामासत्र सुरू असताना दुसरीकडे नवीन अध्यक्ष कोण, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नवीन अध्यक्ष युवा चेहरा असावा, अशी अपेक्षा केली आहे. राहुल यांचे पद सोडण्याचा निर्णय दुर्देवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आता अध्यक्षाच्या रूपाने गतिशील नेता असणे गरजेचे त्यांनी म्हटले आहे. यादरम्यान ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट समर्थक सक्रिय झाले असून भोपाळमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर शिंदे यांना अध्यक्ष करण्याची मागणी करणारे पोस्टर लागले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News