काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच हवेत, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • राज्यातील महिला काँग्रेसचा ठराव
  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे ​

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी सोडू नये, या मागणीसाठी देशभरातील काँग्रेस पदाधिकारी राजीनामे देत असतानाच राज्य महिला काँग्रेसनेही तसाच आज ठराव केला. टिळक भवन काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी केले आहे.

या बैठकीसाठी राज्यातून महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या बैठकीला ॲड. चारुलता टोकस, सचिन सावंत, ममता भूपेश यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीला सामोरे जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले. तसेच, परंपरागत पद्धतीने उमेदवारी न देता भविष्यात थेट जनतेशी संपर्क असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जावी आणि महिलांनी गांभीर्याने तळागाळापर्यंत संपर्क वाढवावा, असे ममता भूपेश म्हणाल्या.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News