राहुल गांधी यांनी भारतीय लष्कर, श्वान पथक, देशाचा अपमान केला : तेजस्वी सूर्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • ‘न्यू इंडिया’मुळे राहुल वादाच्या भोवऱ्यात
  • योग दिनाच्या शीर्षकावरून अमित शहा, राजनाथ सिंह भडकले   ​

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाची खिल्ली उडवताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्‌विट केलेल्या ‘न्यू इंडिया’ या उपहासात्मक फोटो ओळीमुळे ते सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या चौफेर हल्ल्यात सापडले आहेत. भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या एकूणच मानसिकतेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

‘न्यू इंडिया’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताजी घोषणा असली, तरी ‘प्रधानसेवक’, ‘प्रथमसेवक’ या संकल्पनेप्रमाणेच नवभारताच्या कल्पनेचेही मूळ पंडित नेहरू यांच्याच एका ऐतिहासिक भाषणात आहे.  आज राहुल यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून लष्कराचे जवान आणि त्यांच्या श्वान पथकाचा योग करतानाचा एक फोटो ट्‌विट केला गेला व त्याला ‘न्यू इंडिया’ असे शीर्षक दिले. 

त्यांनी पराभवातून अजूनही धडा घेतलेला नाही. त्यांनी एका फटक्‍यात भारतीय लष्कर, शूर जवान, श्वान पथक, योग परंपरा आणि देशाचा अपमान केला आहे.
- तेजस्वी सूर्या, भाजप खासदार

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News