कलम ३७० वरून राहुल गांधींची प्रतिक्रिया; केंद्र सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी ट्विट करत जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे तीव्र टीका केली आहे.

कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी ट्विट करत जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे तीव्र टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलम ३७० रद्द करणे म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे आणि याचे राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, आपल्या देशातील नागरिकांनी देश घडविला आहे. तो केवळ जमिनीच्या तुकड्यांमुळे तयार झालेला नाही. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अटकेत ठेवणे आणि घटनेतील कलमांचे उल्लंघन करणे योग्य नाही. <

>

नव्या रचनेनुसार, जम्मू-काश्मिरचे विभाजन करण्यात येणार असून, लडाख हा नवा केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरही केंद्रशासित प्रदेश होणार आहे. त्याचबरोबर ३७० कलम रद्द करण्यात आले आहे. 

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंगळवार लोकसभेत मांडण्यात आले आहे. लोकसभेत सरकारकडे बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News