आता अजिंक्य रहाणे खेळताना दिसणार दिल्लीकडून ?

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

अजिंक्‍य रहाणे पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल कारण, दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्यासाठी राजस्थान रॉयल फ्रॅंचाईजीकडे भक्कम फिल्डिंग लावली आहे.

नवी दिल्ली : ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयलशी अगदी सुरुवातरीपासूनचे घट्ट नाते असणारा मराठमोळा अजिंक्‍य रहाणे पुढील मोसमात मात्र त्यांच्याकडून खेळताना दिसेल याची शक्यता कमी आहे कारण, दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्यासाठी राजस्थान रॉयल फ्रॅंचाईजीकडे भक्कम फिल्डिंग लावली आहे.

या दोन्ही फ्रॅंचाईजी दरम्यान सकारात्मक चर्चा झाल्यास रहाणे पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसू शकेल. रहाणे यापूर्वी २००८, २००९ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्याने २०१० साली स्पर्धेपासून रहाणेने स्वतःला दूर ठेवले होते. त्यानंतर २०११ मध्ये तो राजस्थानकडून खेळला. राजस्थान फ्रॅंचाईजीवर बंदी आली तेव्हा तो दोन वर्षे पुण्याच्या संघाकडून खेळला. बंदी उठल्यावर तो पुन्हा राजस्थानकडूनच खेळला होता.

आणि त्याने रॉयल्सचे नेतृत्व केले होते मात्र, या वर्षीच्या सुमार कामगिरीमुळे मध्यातच त्याच्याकडून नेतृत्व काढून घेण्यात आले होते आणि स्मिथला नेतृत्व देण्यात आले होते. आता नव्या मोसमात तो कुठल्या संघाकडून खेळेल हे आता दोन संघमालकांच्या चर्चेवरच अवलंबून असेल. दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, कॉलिन मुनर्रो सारख्या दिग्गज सलामीवीरांचा भरणा असताना आता रहाणे कितव्या क्रमांकावर खेळेल हे पाहणेही तितकेच महत्वाचे ठरेल !  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News