फक्त 'त्या' मराठी वाक्यामुळे अजिंक्य रहाणेने काढल्या चक्क 188 धावा

सुरज पाटील (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

अजिंक्य रहाणे हा सध्या टीम इंडियाचा 5 नंबरचा खेळाडू. क्रिकेट जगतात पदार्पण केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून रहाणेचे नाव घेतले जाते

अजिंक्य रहाणे हा सध्या टीम इंडियाचा 5 नंबरचा खेळाडू. क्रिकेट जगतात पदार्पण केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून रहाणेचे नाव घेतले जाते. रहाणेने केलेले कारणामे जितके मोठे आहेत तितकेच ते रोमांचक आहेत, त्यातलाच एक किस्सा म्हणजे एका मराठी वाक्याच्या प्ररणेने रहाणेने चक्क सेंच्यूरी पार करून 188 धावांचा टप्पा पार केला. काय होतं ते वाक्य एकदा वाचाच...

2016 च्या आक्टोबरमध्ये इंदौरचा टेस्ट सामना सुरु होता. खेळपट्टीवर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताची बाजू सांभाळत खडे होते. पहिल्या दिवशी रहाणेने नाबाद 79 धावा काढल्या आणि त्यादिवसाचा खेळ समाप्त झाला. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला रहाणेने त्याचे गुरू प्रविण आमरे यांना फोन लावला. दिवसभर झालेला खेळपट्टावरचा सगळा प्रकार सांगितला, त्यावेळी गुरू प्रविण यांनी त्याला दिलेला कानमंत्र खूप उपयोगी आला.

काय होता कानमंत्र...
तू ज्या खेळपट्टीवर खेळत आहेस, तीथे विकेटला डबल पेस आहे, तू फक्त उभा राहा, रन्स येतील. हे वाक्य त्यावेळी गुरू प्रविण यांनी अजिंक्य रहाणेला सांगितलं. त्यावेळी रहाणेने तेच केलं जे त्याच्या गुरूंनी सांगितलं. त्यादिवशी तो तसाच मैदानात टिकून राहिला, 4 षटकार आणि 18 चौकार करत त्याने 188 धावादेखील काढल्या आणि बाद झाला. सगळ्या देशाला त्याचे द्विशत पू्र्ण न झाल्याचे दु:ख होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News