राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ; मंत्रीपदास धोका ?

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019
  • राधाकृष्ण विखे पाटीलांच मंत्रीपद घटनाविरोधी ?
  • विखेंच मंत्रीपद बेकायदेशीर असल्याचा सतिश तळेकरांचा दावा

मुंबई - राधा राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजप मध्ये प्रेवेश केला. त्यानंतर भाजपनं यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र आता मंत्रीपदाची शपथ घेऊन दोन दिवस होत नाहीत तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद का दिलं? याचं उत्तर सरकारनं द्यावं असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. 

तसेच, बेकायदेशीर मंत्रिपद दिल्याचा दावा करत, अॅडव्होकेट सतिश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली. पक्षांतर बंदी असताना कुठल्याही नेत्याला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात मंत्री म्हणून जाता येणार नाही, असा तळेकर यांचा युक्तीवाद आहे. त्यामुळेच विखे पाटलांना दिलेलं मंत्रिपद बेकायदा असल्याचा  त्यांनी म्हटलं आहे. 

लोकसभा निवडणुकीतील वादावादीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते राज्याचे विरोधी पक्षनेतेपद भूषवत होते. मात्र सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखेंना गृहनिर्माणपद दिलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News