एकीकडे पाणीचं पाणी दुसरीकडे पाण्यासाठी रांगा

मिलिंद देसाई
Saturday, 10 August 2019
  • पंप हाऊसमध्ये मध्ये पाणी शिरल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा बंद
  • त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बॉटल बंद पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

बेळगाव: शहरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये मध्ये पाणी शिरल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बॉटल बंद पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

परंतु खाजगी पाणी शुद्धीकरण केंद्रातही पाणी भरल्याने नागरिकांना अधिक प्रमाणात बॉटल बंद पाणी मिळणेही बंद झाले आहे. तसेच सर्वानाच पाणी विकत घेता येत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा मंडळ आणि विविध संघटनाकडून टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होताच नागरिक पाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. तसेच टँकर गल्लीत येताच महिलांची पाण्यासाठी झुंबड होत आहे.

पंप हाऊसमधील पंप पाण्यात भिजले आहेत. त्यामुळे हिंडलगा आणि हिडकल येथील पंप हाऊस पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. याचा फटका शहरातील लाखो लोकांना बसत असून घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी चार पाच दिवसांपासून कष्ट घेतलेल्या नागरिकांना आता पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तसेच शहरातील अनेक भागात खंडीत झालेला वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही त्यामुळे अनेक भाग अजूनही अंधारात आहे याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News