प्रा. डॉ. राम भिसे 'बेस्ट एरिया कोऑर्डिनेशन अवॉर्ड'ने सन्मानित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

गेली 3 वर्षे NSS क्षेत्र समन्वयक म्हणून काम करत असणारे डॉ. राम भिसे यांना मुंबई विद्यापिठाकडून 'उत्कृष्ट क्षेत्र समन्वयक' म्हणून पुरस्कृत करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू श्रिधर कुलकर्णी, प्रा. डॉ. अजय देशमुख, परिक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. अनिल पाटील, मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना दलाचे संचालक प्रा. सुधिर पुराणीक आदी प्राध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. डॉ. राम भिसे यांची एनएसएसमधली सुरूवात ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी येथून झाली. त्यानंतर ते वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संधीच्या जोरावर प्रोग्राम ऑफिसरपर्यंत पोहोचले. ग्रामीण भागातील असल्यामुळे आणि लोकांप्रती आपुकीलीची भावना, ओढ हेच या यशाचं मोठं कारण आहे.

सात दिवस निवासी छावणी, एनएसएसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले उपक्रम आणि समाजात आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या योग्य संधीमुळे प्रा. डॉ. राम भिसे यांनी NSS प्रोग्राम ऑफिसरपर्यंत यश मिळवले. त्यानंतर नगर येथे झालेल्या प्रोग्राम ऑफिसरच्या ट्रेनिंगमधून एरिया कोऑर्डिनेशन म्हणून निवड झाली. आजपर्यंत तब्बल 20 ते 23 महाविद्यालयांमध्ये 5000 हून अधिक विद्यार्थी NSSला जोडण्याचं काम प्रा. डॉ. राम भिसे यांनी केलं आहे.

सोशल वर्क करण्याची आधीपासूनच आवड होती. समाजासाठी काही तरी करण्याची लहानपणापासूनच इच्छा होती. NSS च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले, त्यातलाच एक उपक्रम म्हणजे NSS आणि NMC जोडून १६ कॉलेजेसच्या मुलांना डिझास्टर मॅनेजमेन्ट प्रीपेअरनेसचे प्रशिक्षण दिले. तसेच अजून 'ई वेस्ट मॅनेजमेन्ट', वॉटर अवेअरनेस, डिजिटल इंडिया या सर्वांचे प्रशिक्षण NSS च्या माध्यमातून दिले गेले.

प्रा. डॉ. राम भिसे
NSS ही तरुणांना प्रत्येक क्षेत्रात लिडरशिप करण्याचं सर्वोत्तम व्यासपीठ आहे. समाजामध्ये पुढाकार घेऊन वेगवेगळी कामे यशस्विरित्या पार पाडण्याची ताकद NSSमधून मिळते. शासकिय नोकरी, प्रत्येक सेममध्ये मिळणारे ज्यादा गुण मिळणे, परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणे, अशा अनेक संधी NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी NSS मध्ये आपला सहभाग नोंदवावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News