पुण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा प्रियकराकडून खून; दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय

सकाळ वूत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

 पुणे - पुण्यातील चंदन नगर परिसरातील एका विद्यार्थिनीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी सकाळी समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला तिचा प्रियकर सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने चंदननगर येथे राहणाऱ्या तरुणीच्या घरात घुसून मंगळवारी रात्रीच तिचा खून केला. पीडित तरुणी मूळची गोंदिया येथील रहिवासी असून ती पुण्यात शिक्षण घेतानाच नोकरी सुद्धा करत होती. दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याचा संशय  होता.

 गोंदियातील असलेली 22 वर्षीय तरुणी पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. याच दरम्यान तिला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. त्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणासोबत तिची मैत्री होती. दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याचीही चर्चा होती. मात्र काही महिन्यांपासून तरुणी दुसऱ्या एका तरुणाच्या संपर्कात असल्याचा संशय किशोरला होता. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याशी अफेअर झाल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला. आणि किशोरने आपल्याच  प्रियसीचा जिव घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News