पबजी खेळला आणि जीव गेला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

राहुरी - रमजान ईदच्या दिवशी आंबी (ता. राहुरी) येथे मुस्लिम तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. फारूक मन्सूर इनामदार (वय १९, रा. आंबी) असे त्याचे नाव आहे. ‘पबजी’ गेमच्या आहारी जाऊन त्याने आत्महत्या केल्याचे पोलिस पाटील बाळासाहेब लोंढे यांनी सांगितले.

आंबी येथील घरापासून २५० मीटरवरील प्रवरा नदीकाठी झाडाला गळफास घेऊन आज दुपारी फारूक याने आत्महत्या केली. दुपारी त्याचा मोठा भाऊ शाहरुख यास गळफास घेतलेल्या अवस्थेत फारूकचा मृतदेह आढळून आला.

याबाबत पोलिस पाटील लोंढे म्हणाले, की मोबाईलवर ‘पबजी’ खेळण्याचे फारूकला व्यसन होते. दिवसभरात तो सात ते आठ तास मोबाईलवर हा गेम खेळत असे. गावातही तो फारसा कोणाशी बोलायचा नाही. त्याचे हे व्यसन गावातील सर्वांना माहिती होते; परंतु त्याचा कुणाला त्रास नव्हता. त्यामुळे कोणीही त्यास हटकले नाही.

ईदचे नमाज पठण करून आल्यावर घरी त्याने जेवण घेतले. नंतर तो नेहमीप्रमाणे मोबाईलवर गेम खेळत बाहेर गेला. त्याच नादात त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. फारूख इनामदार याच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News