क्रिया योगावरील पुस्तकांचे प्रकाशन

रसिका जाधव
Sunday, 23 June 2019

मुंबई: बाबाजींची दिव्य वाणी या क्रियायोगावरील तीन खंडांच्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ शनिवार (ता.२२) रोजी संध्याकाळी ४ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर मिनी थिएटर मध्ये संपन्न झाला.

हा कार्यक्रम बाबाजी क्रिया योगा ट्रस्ट बेंगलोर यांच्या वतीने आयोजीत केला होता. श्री क्षेत्र परमधाम तपोवन परिवाराचे श्री गुरुजी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून किशोर श्रीराम वारे, त्रिशला माँ, सुधाकर डी. जोशी, विनोद कुमार, आचार्य गुरूदासन उपस्थित होते. 

पुस्तकाचा हा मराठी अनुवाद प्रा. हेमलता जोशी यांनी केला आहे. महावतार बाबाजी यांचे निवेदन त्यांचे परमशिष्य व्ही. टी. नीलकांचन व एस. ए. ए. रामय्या यांनी जसेच्या तसे यापूर्वी इंग्रजीमध्ये प्रकाशित केले होते. 

क्रिया योग ही एक प्राचीन काळातील योगसाधना. तमोगुणात लुप्त झालेली ही साधना बाबाजींनी पुनर्जीवित केली. महावतार बाबाजी हे भगवान कृष्णाचे कलियुगातील अवतार मानले जातात. 

कलियुगाच्या प्रभावामुळे जगामध्ये विविध धर्मामध्ये वैरभावना वाढत आहे, त्यांचे संतुलन साधण्याचे कार्य या साधनेद्वारे बाबाजीं करीत असतात. हिमालयनिवासी जगत्‌व्यापी, स्मर्तृगामी, शिवस्वरुप, परमगुरु महावतार बाबाजी या जीवांना दिशा व मार्ग दाखविण्याचे कार्य अखंड अविरत करीत आहेत. या कार्याची त्यांची पद्धत मानवी बुद्धिस अनाकलनीय आहे परंतु प्रत्येक जीवास आवश्यक त्या साधनामार्गाचे मार्गदर्शन ते निरपेक्षपणे करीत असतात. 

पुस्तक प्रकाशनानंतर क्रियायोग साधनेविषयी सविस्तर माहिती आचार्य गुरुदासन यांनी दिली. यावेळेस भक्तगण व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News