युवकांनी केली रेनवॉटर हार्वेस्टींगची जनजागृती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • संपूर्ण देशात भूजल पातळी खालावत आहे
  • पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या जिरण्याची गती आधीच कमी आहे.
  • घर, अंगणात फ्लोरिंग, काँक्रिटमुळे पाणी जिरण्याचे प्रमाण कमी झाले आहे

चंद्रपूर: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत युवकांच्या इको-प्रो संस्थेने आजपासून रेनवॉटर हार्वेस्टींग जनजागृती व संकल्प अभियानाची सुरवात केली. 

चंद्रपूरसह संपूर्ण देशात भूजल पातळी खालावत आहे. याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. एकीकडे प्रचंड उष्णता, कमी पर्जन्यमान, पावसाचे दिवस कमी झाले आहे. असे असतानाही उद्योग, नागरिकांकडून बोअरवेल खोदण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या जिरण्याची गती आधीच कमी आहे. अलीकडे सर्वत्र क्राँकिटच्या रस्त्याचे जाळे निर्माण होत आहे. घर, अंगणात फ्लोरिंग, काँक्रिटमुळे पाणी जिरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी शहरातही दोनशे फुटांपेक्षा अधिक खोलवर गेलेली आहे. यावर उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको-प्रो संस्थेकडून रेनवॉटर हार्वेस्टींग जनजागृती व संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमाने शहरात सर्वत्र जनजागृती करीत पावसाचे पाणी बोअर-विहिरीला पुनर्भरण करण्यासंदर्भात तसेच रेनवॉटर हार्वेस्टींग प्रकल्प तयार करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. इच्छुक नागरिकांना संस्थेतर्फे तांत्रिक सहकार्य आणि माहिती देण्यात येणार आहे. अभियानाची सुरवात शहरात ठिकठिकाणी पत्रके वाटप करून करण्यात आली. अभियान इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख नितीन रामटेके यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, नितीन रामटेके, सुधीर देव, अमोल उट्टलवार, बिमल शहा, सुनील पाटील, बंडू दुधे, राजू काहीलकर, प्रमोद मलीक, सचिन धोतरे, ओम वर्मा, स्वप्नील रागीट सहभागी झाले होते.

"भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, याकरिता ज्यांच्याकडे बोअर, विहीर आहे. अशा सर्व नागरिकांनी स्वंयउत्स्फुर्तपणे रेनवॉटर हार्वेस्टींग करण्यासाठीपुढे येण्याची गरज आहे. नव्याने बोअर-टयूबवेल खोदण्यावरसुद्धा प्रशासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे."
- बंडू धोतरे, अध्यक्ष इका प्रो संस्था चंद्रपूर.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News