न बोलल्या जाणाऱ्या विषयावर "कबिरा'ची जनजागृती, मासिक पाळीसंदर्भात प्रबोधन

परशुराम कोकणे, सोलापूर 
Sunday, 30 June 2019

मासिक पाळी मुलींना, महिलांना घरात बाजूला बसवणे. सॅनिटरी नॅपकिन ऐवजी कपड्याचा वापर करणे, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर सोलापुरातील तरुणाईने एकत्र येवून प्रबोधनाला सुरवात केली आहे. 

येथील कबिरा फाऊंडेशनच्या माध्यमातून मासिक पाळीसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. सोबतच सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येत आहे. 

मासिक पाळी मुलींना, महिलांना घरात बाजूला बसवणे. सॅनिटरी नॅपकिन ऐवजी कपड्याचा वापर करणे, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर सोलापुरातील तरुणाईने एकत्र येवून प्रबोधनाला सुरवात केली आहे. 

येथील कबिरा फाऊंडेशनच्या माध्यमातून मासिक पाळीसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. सोबतच सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येत आहे. 

कबिरा फाऊंडशेनच्यावतीने पहिला उपक्रम शासकीय रेणुका माता महिला वस्तीगृह येथे राबविण्यात आला. मासिक पाळीविषयी माहिती देत आरोग्य विषयक शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी वस्तीगृहाच्या अधिक्षका स्नेहल माने, ऋतुपरिता फुलारी, चित्रा इनामदार यांनी मुलींशी संवाद साधला. 

मुलींनी न लाजता आपल्या मनातील शंका विचारल्या. याच ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. 

कबीरा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यजीत वाघमोडे, डॉ. प्रिया अय्यार, डॉ. मनिषा शिंदे, डॉ.सायली शेंडगे या तरुणांनी शहरातील विविध वस्तीगृह, महिला आश्रम, शाळा, महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन पॅडचे मोफत वाटप व समुपदेशनाचा उपक्रम हाती घेतला आहे. 

शासकीय रेणुकामाता महिला वस्तीगृहातील कार्यक्रमावेळी सत्यजित वाघमोडे, अतिश शिरसट, सुमित शिवशरण, रत्नदिप रणदिवे, अनुप गायकवाड, अनुराग सुतकर आदी तरुण उपस्थित होते. 

"मासिक पाळीच्या काळात वाटणारी असुरक्षितता यासोबतच जोडल्या गेलेल्या चुकीच्या प्रथा या महिलांना अंधश्रध्देत अडकून टाकतात. 

मासिक पाळीमुळे मुलींची शाळा सुटते. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक महिन्यात तिला पाच दिवस घरात बाजुला बसवणे असे अनेक प्रकार सुरु होतात. अनेक सामान्य कुटुंबातील मुलींच्या संदर्भात असेच घडते. महागडे सॅंनिटरी नॅंपकिन्स विकत घेणे परवडत नाही म्हणुन घरगुती सुती कापडाच्या घड्या त्यांना वापराव्या लागतात.' याबाबत आम्ही प्रबोधन करत आहोत असे सत्यजीत वाघमोडे यांनी सांगितले. 

आजही अनेक कुटूंबात मुलगी वयात आल्यावर पालकांच्या मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमजुती, अंधश्रध्दा आहेत. पहिल्या मासिक पाळीनंतरच मुलींचे शाळेचे गळतीचे प्रमाण वाढते. ग्रामीण भागात आणि शहरातही बऱ्याच प्रमाणात पहिल्या मासिक पाळीनंतर मुलगी शहाणी झाली म्हणून महीनाभर तिला बाहेर पाठवत नाहीत. ही मानसिकता बदलण्यासाठी आम्ही प्रबोधन करत आहोत. 
- सत्यजित वाघमोडे, संस्थापक, कबीरा फाऊंडेशन

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News