मानसोपचारतज्ज्ञ धर्मेंद्र 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

अभिनेता धर्मेंद्र लवकरच एका हॉरर कॉमेडी चित्रपटात वेगळी भूमिका साकारणार आहेत. ‘खली बली’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात ते मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारणार आहेत

मुंबई : अभिनेता धर्मेंद्र हे बॉलीवूडमध्ये बरेच वर्ष वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आले आहेत. आता ते लवकरच एका हॉरर कॉमेडी चित्रपटात वेगळी भूमिका साकारणार आहेत. ‘खली बली’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात ते मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. धर्मेंद्र यांच्याबरोबर अभिनेत्री मधू, कायनात अरोरा, अभिनेता रजनीश दुग्गल, राजपाल यादवसारखे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती कमल किशोर मिश्रा करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News