‘यू-टर्न’ वेबसीरिजमध्ये सायली-ओमप्रकाश एकत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

अभिनेता ओमप्रकाश शिंदेला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘खुलता खळी खुलेना’ या मालिकेमुळे. तर अभिनेत्री सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ या तिच्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच दोघेही पहिल्यांदाच ‘यु-टर्न’ या वेबसीरिजमधून वेबविश्‍वात पदार्पण करत आहेत.

मुंबई :  अभिनेता ओमप्रकाश शिंदेला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘खुलता खळी खुलेना’ या मालिकेमुळे. तर अभिनेत्री सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ या तिच्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच दोघेही पहिल्यांदाच ‘यु-टर्न’ या वेबसीरिजमधून वेबविश्‍वात पदार्पण करत आहेत.

नवरा-बायकोच्या जीवनावर ही वेबसीरिज आधारित आहे. यामध्ये सायलीच्या पात्राचे नाव मुक्ता; तर आदित्य हे ओमप्रकाशच्या पात्राचे नाव असणार आहे. मयुरेश जोशी यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News