मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार संशोधनाच्या संधी

शिवचरण वावळे
Tuesday, 30 July 2019

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती  कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी दिली.

नांदेड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे संगणकाशी जोडलेले एकमेव विद्यापीठ असून प्रवेश प्रक्रिया परीक्षा मूल्यमापन संगणकाद्वारे होत आहे. आता हे विद्यापीठ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध करून देणारा असून मानव संसाधन विभागाची याबाबत चर्चा झाली. असे मत यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी केले. शहरातील कुसुम सभागृहात नांदेड विभागीय कार्यालयाचा पदवी वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे विभागीय संचालक जांभळे पाटील डॉक्टर अंबादास मोहिते नारायण मोरे सहाय्यक उपकुलसचिव चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू वायुनंदन म्हणाले की मुक्त विद्यापीठात सहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना सोयीसाठी ई-बुक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुक्त विद्यापीठातून महिला अल्पसंख्यांक व ग्रामीण भागातील नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय संचालक डॉ. जांभळे पाटील यांनी केले, नांदेड विभागीय कार्यालयाने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. अभ्यास केंद्राच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राहून दोन गावे दत्तक घेतल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी विभागीय केंद्राच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या. या विभागातून चोवीस हजार विद्यार्थ्यांना पदवी वितरण केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणतात, मुक्त विद्यापीठाने वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी व स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होत आहेत. मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले, असे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमात नांदेड विभागातील हिंगोली परभणी लातूर नांदेड जिल्ह्यातील नऊशे विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संदीप काळे, डॉ. सुभाष रगडे, डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, प्रा. नामदेव पवळे, प्रा. शरद वाघमारे, प्रा. सचिन झरीकर, प्रा. राज गायकवाड, डॉ. एन आर कांबळे, डॉ. जीजी शिंदे, डॉ. गजानन लोमटे, शंकर अंग्रे, दिग्विजय देशमुख, कैलास सूर्यवंशी, इमरान खान यांच्यासह नियोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शारदा निवाते यांनी तर आभार सहाय्यक कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News