सांगलीच्या झरे विद्यालयात पदवी प्रमाणपत्र प्रदान

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

सांगली - अहिल्यादेवी शिक्षण संस्था सांगलीचे पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अध्यक्ष आर. एस. चोपडे, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर उपस्थित होते.

प्रस्ताविक प्रा. आर. एच. पाटील यांनी केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘ग्रामीण दुष्काळी भागात मुला-मुलींना  शिक्षणाची सोय उपलब्ध झाली असल्याने उच्च शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाहीत.’’ यावेळी आर. एस. चोपडे म्हणाले,‘‘ ग्रामीण भागातील मुलींनी चूल आणि मूल ही संकल्पना बाजूला ठेवून स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आपली अपुरी स्वप्ने पुढच्या पिढीत साध्य करण्यासाठी धडपडले पाहिजे.’’ 

या वेळी उपाध्यक्ष एल. टी. शेडगे, ए. एम. वाघमोडे, एस. के. कदम, डी. एस. स्वामी, एस. व्ही. आनुसे, ए. एस. पडळकर, पी. बी. स्वामी, डी. के. हेगडे, बी. पी. सरगर, एस. एन. वीरकर, एस. एस. शेंडगे, प्राचार्य आर. एच. पाटील, मुख्याध्यापक व्ही. व्ही. सलगर, प्राध्यापक डी. एस. देवकुळे, एम. डी. खांडेकर, यु. जि. खोत, आर. व्ही. कळेल, दाजी पाटील, एस. बी. माने, के. के. माने, सी. बी. करंडे, एस. एस. नागणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News