नीट परीक्षेत अकोल्याची दिशा मुलींमधून राज्यात पहिली

विवेक मेतकर
Wednesday, 5 June 2019
  • ७२० गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत ६८५ गुण मिळवुन राष्ट्रीय स्तरावर ५२ व्या स्थानावर
  • किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन परीक्षेत स्कॉलरशिप मिळविली
  • वडील जैन इरिगेशन खासगी कंपनीत नोकरीला
  • आई डॉ. अलका अग्रवाल यांची खासगी प्रॅक्टिस

अकोला: एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ५ मे रोजी झालेल्या नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स (नीट) परीक्षेत अकोल्याच्या दिशा समीर अग्रवाल हिने राज्यात मुलींमधून अव्वल क्रमांक पटाकविला आहे. तर ७२० गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत ६८५ गुण मिळवताना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅन्क) ती ५२ व्या स्थानावर आहे.

आदर्श महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा अग्रवाल हिने या आधी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या परीक्षेत स्कॉलरशिप मिळविली होती. ऑलिम्पियाड स्पर्धेसह इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर (आयएपीटी) या परीक्षेच्या माध्यमातून तिने भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीनही परीक्षेत तिची निवड झाली होती. तिचे वडील जळगाव येथील जैन इरिगेशन या खासगी कंपनीत नोकरीला असून, आई डॉ. अलका अग्रवाल यांची खासगीमध्ये प्रॅक्टिस सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News