बीड जिल्ह्यातील ट्रेकर्स ग्रुपकडून किल्ल्यांचे संवर्धन

जालींदर धांडे
Friday, 25 January 2019

जिल्ह्यातील माजलगाव येथील १५० युवकांनी एकत्रित येत जांबाज ट्रेकर्स ग्रुपची निर्मीती केली. या ग्रुपच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच किल्यांची स्वच्छता करण्यावर भर दिला असून, मागील तीन वर्षांपासुन हा ग्रुप किल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहिम राबवून आगळा-वेगळा उपक्रम राबवत आहे.

जिल्ह्यातील माजलगाव येथील १५० युवकांनी एकत्रित येत जांबाज ट्रेकर्स ग्रुपची निर्मीती केली. या ग्रुपच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच किल्यांची स्वच्छता करण्यावर भर दिला असून, मागील तीन वर्षांपासुन हा ग्रुप किल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहिम राबवून आगळा-वेगळा उपक्रम राबवत आहे.

छत्रपती शिवराय यांच्या काळात असलेल्या समुद्रावरील आरमाराचा  ट्रेकींगव्दारे परिपूर्ण अभ्यास जांबाज ट्रेकर्स ग्रुप करत असतो. युवकांनी व्यवसनापासून दुर राहिले पाहिजे, याकरिता युवकांना शिवरायांच्या विचारांची प्रेरणा या मोहिमेदरम्यान देण्यात येते. मागील तीन वर्षांपासून १५० युवकांनी संघटन करून सह्याद्रीच्या कडेकपारी माहिती करून घेतल्या आहेत.

शिवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीकडे प्रत्येक तरूण धाव घेत आहे. या तरूणांनी आजपर्यंत पद्मदुर्ग, तिकोणा, तुंग, सुधागड, विसापुर, लोहगड, पन्हाळा ते पावनखिंड, वासोटा, अजिंक्यतारा यासह ५० पेक्षा अधिक किल्यांची स्वच्छता व  ट्रेकिंग केलेली आहे. किल्ला परिसरात पडलेल्या पाण्याच्या बॉटल, पॉलिथीन बॅग आदी कचरा स्वच्छ करून प्रत्येक युवक गडावरून गोळा केलेला कचरा स्वतःच्या बॅगमध्ये घेऊन गडाच्या खाली आणुन त्याची विल्हेवाट लावण्यात येते.

किल्ल्यावर स्वच्छता मोहिम करतेवेळी प्रत्येकांना स्वच्छतेचा संदेश देउन किल्ल्यावर स्वच्छता राखण्याचे आवाहन या ग्रूपद्वारे केले जाते. पुरातन असलेला ठेवा अविरत जपुन रहावा यासाठी हा जांबाज ट्रेकर्स ग्रुप पुढाकार घेतो. यामध्ये विजयसिंह सोळंके, पुरूषोत्तम जाधव, निलेश काकडे, सचिन अंडिल, अक्षय पायघन, युवराज लगड, धनराज धुमाळ, मुकूंद सोळंके, गोपाळ निवारे, योगेश सोळंके, अंगद सवणे, अजय बादाडे यांचेसह १५० सदस्य सहभागी असतात. विजयसिंह सोळंके, महेश आगे, सचिन अंडील, अक्षय पायघन, तेजसिंह सोळंके या पाच जणांनी सुरूवातीस पन्हाळा ते पावनखिंड ही मोहिम केली होती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News